मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम परंडा तालुक्यातील विविध ठिकाणी साजरा

परांडा|

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद संचालित विवेकानंद युवा मंडळ शिरसाव या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधानाच्या आव्हानंतर  मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण तसेच ग्रामपंचायत व  आरोग्य उपकेंद्र शिरसाव या ठिकाणी 75 वृक्ष लागवड करण्यात आली. उपक्रम नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद जिल्हा समन्वयक माननीय श्री धनंजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
अशी माहिती विवेकानंद युवा मंडळाचे सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर चोबे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक साहेब ,गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आशाताई , मुख्याध्यापक, शिक्षक इत्यादी उपस्थित होते तसेच राघूची वाडी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी शहीद आनंदजी घेतले यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून आदरांजली दिली या उपक्रमासाठी धनंजय काळे जिल्हा समन्वयक उस्मानाबाद हे उपस्थित होते. ग्लोबल शैक्षणिक संस्था पिंपरखेड या ठिकाणी देखील पंचप्राण शपथ ग्रहण करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक, संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments