वैराग मधील एकाची ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून १० लाखाची फसवणूक


वैराग |

ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून वैराग मधील एकाची १० लाखाची फसवणूक झाली आहे, या घटनेची फिर्याद वैराग पोलिसात दाखल करण्यात आली असून एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग शहरातील शारदा देवी नगर येथील वैजनाथ रघुनाथ आदमाने यांची ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून विनोद गोविंद जाधव रा. शेंदुर्जना ता. मनोरा जि. वाशिम यांनी फसवणूक केली आहे. २ फेब्रुवारी २०१७ एन एफ टी द्वारे जाधव यांना २ लाख रुपये व ८ लाख रुपये रोख अशी रक्कम दिली होती परंतु ऊसतोड मजूर पुरवले नाहीत, व पैसेही माघारी दिले नाहीत आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधवर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments