२१ वर्षीय तरुणाची एकतर्फी प्रेमातून गळफास घेऊन आत्महत्या ; चिट्टीत लिहले तिने माझा फक्त वापर केला



कोल्हापूर |

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून एकतर्फे प्रेमातून २१ वर्षीय तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) असे त्या तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने आयुष्याचा शेवट केला. मंगळवारी ही उघडकीस आली. या घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. 

या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. 

दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले आहे. तिला मी विसरू शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी.  

Post a Comment

0 Comments