बार्शी | एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अज्ञातावर गुन्हा दाखलबार्शी :

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळून नेण्याची तक्रार पांगरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामाकडे जाते असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून गेले. परंतु ती मामाकडे न जाता कुठेही आढळून आली नाही. तिची इतर नातेवाईकाकडे चौकशी केली असता तिच्याशी संपर्क चालला नाही. या घटनेची फिर्याद पांगरी पोलिसात मुलीच्या वडिलांनी दाखल केली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फुस लावून पळून नेण्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात पांगरी पोलिसात भादवी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पांगरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments