टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग दुसऱ्यांदा वडील झाला आहे. युवराजची पत्नी हेजल कीच हीने मुलीला जन्म दिला आहे. युवराज सिंग आणि हेजल कीच यांचं 2016 मध्ये चंदीगडमध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या सहा वर्षानंतर युवराज आणि हेजल यांनी एका मुलाला जन्म दिला होता. युवराज सिंग याने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांनी ही गोड बातमी सांगितली आहे. तसेच आपल्या मुलीचं नाव ऑरा असं ठेवलं आहे. युवराज सिंगने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, स्लीपलेस नाइट चांगली वाटू लागली कारण छोट्या ऑराने आमचं कुटुंब पूर्ण केलं. त्यामुळे ऑरा या नावाचा अर्थ काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
ऑरा म्हणजे अशी व्यक्ती जिच्यात काही खास गुण आहेत. ती व्यक्ती सर्वांपेक्षा वेगळी असण्याची जाणीव करून देते. ऑरा या शब्दाचा अर्थ प्रभामंडळ, आभा असा होतो. युवराज सिंगने आपल्या मुलाचं नाव ओरियन ठेवलं आहे. हे नावही युनिक आहे. ओरियन म्हणजे नक्षत्र तारा.
,
0 Comments