भारतीय वित्तीय साक्षरता सामान्य स्पर्धेत सिरसाव प्रशालेच्या 'या' विद्यार्थ्यांनी मिळवली यश


सिरसाव |

भारतीय रिझर्व बॅंक अखिल 'भारतीय वित्तीय साक्षरता सामान्य ज्ञान'स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला सिरसावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. वित्तीय साक्षरतेमध्ये ही स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती, या स्पर्धेमध्ये प्रशालीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये वायकुळे दिव्या दत्तात्रय इ.१० वी आणि वायकुळे सार्थक मारुती इ. ८ वी या सिरसाव प्रशालेतील तिसरा क्रमांक पटकावला असून  याचबरोबर पाच हजार रुपये शिष्यवृत्ती , प्रमाणपत्र व ट्राँफी  मिळवली. 

यावेळी डायट कॉलेजचे आदरणीय प्राचार्य जटनुरे, एसबीआय रीजनल मॅनेजर मेहता, आरबीआय ऑफिसर राहुल यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक बन, मार्गदर्शक खताळ यांच्या सर्व शिक्षकांचे व दोन्ही विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments