बार्शी | कडबा कुट्टीच्या मशीनचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू


बार्शी |

बार्शी तालुक्यातील गोडसेवाडी येथे कडबा कुट्टी च्या मशीन चा करंट लागून एका ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दिनाक २०/७/२०२३ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा बार्शी तालुक्यातील गोडसेवाडी येथील शेतकरी अनिल निर्मळ यमगर वय ४२ या शेतकऱ्याचा कडबा कुट्टीच्या मशीनने कडबा कट करत असता कडबा कुटीच्या मशीनचा करंट लागून मृत्यू झाला आहे.

 अचानक झालेल्या मृत्युमुळे कुटुंब व गावात शोककळा पसरली आहे ,पावसाळ्यात शेतकऱ्यांनी विजेची उपकरणे सांभाळून हाताळण्याची सावधानी बाळगण्याची गरज असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments