सांगली |
लग्नाचे आमिष दाखवून पोलीस महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडलीय. याप्रकरणी पीडित महिलेनं विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून पोलीस दलातील वसीम शब्बीर ऐनापुरे (वय 35) आणि त्याचे वडील शब्बीर महबूब ऐनापुरे (दोघे रा.संजनयनगर, सांगली) या दोघांवर गुन्हा नोंद झालाय. पोलिस कर्मचारी वसीमला पोलिसांनी अटक केलीय.
पीडित महिला ही सांगली पोलिस दलात नोकरीला आहे. सांगली पोलिस बँड पथकातील वसीम ऐनापुरे याच्यासोबत पीडितेची ओळख झाली. या ओळखीतून वसीम ने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून दि. 4 मार्चपासून दि. 6 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायक नगर येथे नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला. यामध्ये पीडित पोलिस महिला गर्भवती राहिली. पीडित गर्भवती असल्याचं समजल्यानंतर संशयित वसीम याने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीनं गोळ्या खायला घातल्या. तसेच यासाठी वसीमच्या वडिलांनी तक्रार करू नये म्हणून पीडितेच्या भावाला फोनवरून धमकावलं. याबाबतची तक्रार पिडीत महिलेनं विश्रामबाग पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी वसीमला पोलिसांनी अटक केलीय.
0 Comments