"सिरसावकर तरुणाच्या तत्परतेमुळे वाचले अपघातग्रस्त युवकाचे प्राण...!"बार्शी |

 कुर्डूवाडी - लातूर बायपास रोड वरील, नागोबाची वाडी चौक या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वार जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. रस्त्याने ये - जा करणारे प्रवासी फक्त बघ्याची भूमिका करत होते.

  अपघातामधील जखमीची अवस्था पाहून अक्षय बानगुडे यांनी घटनास्थळी उपस्थित सुमेशसिंह जाधव व विजयराज पाटील यांचे सहकार्य घेऊन, जखमीला तात्काळ ग्रामीण रुग्णालय बार्शी या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.

बार्शी ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमीवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. यावेळी सदरील जखमीची चौकशी केली असता, तो युवक नामे सुरेश रमेश कदम, वय 28 वर्षे, राहणार गाताचीवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले.

 यावेळी भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी, तात्काळ जखमींच्या कुटुंबीयांना सदरील घटनेची माहिती दिली.  भगवंत सेना दलाच्या तत्परतेमुळे एका युवकाचे प्राण वाचले असून, याचे समाधान शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखे नसून, ते आपले सामाजिक कर्तव्य असल्याची भावना यावेळी भगवंत सेना दलाचे सदस्य अक्षय बारंगुळे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments