मोठी बातमी ! बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरचा सोडला दावा


मुंबई |

बच्चू कडू यांनी आपण मंत्रिपदावरचा दावा सोडत असल्याचंं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आहेत. मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडत आहे, असं मी आज जाहीर करतो. मला दिव्यांग विभागाचं काम दिलंय. त्यामुळं मी मंत्रिपदावरचा दावा सोडलाय. हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्रिपद द्या, असं बच्चू कडू म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मग मंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट करेन, असं बच्चू कडू यांनी काही दिवसांआधी म्हटलं होतं. ती बैठक झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल बैठक झाली. त्यांनी सांगितलं की आपली मैत्री कायम राहीली पाहीजे.मुख्यमंत्री सध्या अडचणीत आहेत. मला दिव्यांग खाते दिले म्हणून मी मंत्रिपदाचा दावा सोडतोय. मी मंत्रिपदाचा दावा करणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments