मिर्झनपूर येथे १४ वर्षीय मुलाला पाण्यात बुडवून ठार मारले ; चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखलबार्शी |

बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर  येथे १४ वर्षीय युवकाला पाण्यात बुडवून ठार मारल्याची फिर्याद वैराग पोलिसात दाखल करण्यात आली आहे. १३ जून रोजी जाईद राजू शेख मित्राबरोबर पोहण्यासाठी विहिरीवर गेला होता. त्यावेळी तो विहिरीतील पाण्यात बुडून मयत झाला, त्याला पाण्यात बुडून मारल्याची तक्रार मयताची आई  परविन राजू शेख (वय ३०) रा. मिर्झनपूर ७ जुलै रोजी यांनी वैराग पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुला पोहायला चल म्हणले असता तू वेळेवर का येत नाही असे म्हणत जाहीर राजू शेख याला विहिरीतील पाण्यात ढकलून दिले व त्याच्या अंगावर उड्या मारून जीवे ठार मारले, अशी फिर्याद वैराग पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या चौघाजणांविरुद्ध भादवी कलम ३०२,३२३,५०६ व ३४ कालमानुसार वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments