धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ; खा. ओमराजे बालंबाल बचावले

 
 
धाराशिव |

 शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न आज सकाळी घडला असून, याप्रकरणी  ढोकी पोलिसांनी चालकास अटक करून नोटीस देऊन सोडून दिले.. हा घातपाताचा प्रकार की दुसरे काही याचा तपास ढोकी पोलीस  करीत आहेत. मी सुखरूप असुन सुदैवाने वाचलो अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली. 

खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी गोवर्धनवाडी ते तेर या रोडवर व्यायामासाठी जात असताना सीड फार्मजवळ पाठीमागून जोरदार वाहनाचा आवाज आला त्यावेळी एक भरधाव टिप्पर एमएच 44 के 8844 आले तो अंगावर येत असल्याचे पाहताच त्यांनी उडी मारली , त्यामुळे ते बालंबाल बचावले .  त्यानंतर पाठीमागून येत असलेल्या उमेश थोडसरे यांच्या मोटरसायकलवरून टिप्पर चालकांचा पाठलाग केला, त्यावेळी टिप्पर रेल्वे फाटकवर पडलेने थांबले. ड्राइव्हरने त्याचे नाव रामेश्वर कांबळे सांगितले. तो बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील रहिवासी आहे. 

हा प्रकार मोटार सायकल ओव्हरटेक करताना चुकीने घडला असल्याचे चालकाने सांगितले असुन हा घातपाताचा प्रकार की दुसरे काही याचा पोलीस तपास करीत आहेत. मी सुखरूप असुन सुदैवाने वाचलो अशी प्रतिक्रिया ओमराजे यांनी दिली.  ढोकी पोलिस ठाण्यात कलम 279, 336, 184 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास राजाभाऊ सातपुते हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments