रणवीर राऊत भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख


बार्शी |

भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामध्ये, २४६ बार्शी विधानसभेसाठी २०२४ साठी निवडणूक प्रमुख म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच, सर्वांचे अभिनंदनही केले. त्यामुळे, विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या मतदार संघातील निवडणुकीची धुरा त्यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments