सोलापुरातील हा बडा नेता करणार बीआरएस प्रवेश ; राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच खिंडार


सोलापूर |

तेलंगणातील बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीने सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्‍क दिला आहे. तेथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

अभिजीत पाटील यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी तर्फे विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याचे संकेत पवारांनी दिले होते. तेव्हापासून भगीरथ भालके नाराज होते.

बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात आपले हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. त्यांना त्यात हळूहळू यश येत असून ठिकठिकाणचे कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या गळाला लागत आहेत. सरकोली भागात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात भगीरथ भालके हे त्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. भगीरथ यांनी भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात विधानसभेची पोट निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती.

Post a Comment

0 Comments