नगरपरिषदेचा मुख्याधिकारी विनायक औंधकर २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक


                             
 सांगली |

सरकारी अधिकार्यांनी लाच घेण्याचा प्रकार चिंताजनक बनला आहे.सोमवारी नाशिक येथील उपनिबंधक सतीश खरे याला ३० लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.            

मिळालेल्या माहितीनुसार,मुख्याधिकारी औंधकर याने वीटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम २ लाख रुपये स्वीकारताना त्याला एसीबीच्या अधिकार्यांनी पकडले.    
    
                       
तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून औंधकर हा परवान्यासाठी अडीच लाख रुपये मागणी करत असल्याची माहिती दिली होती, त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली.             

दरम्यान तीन महिन्यापूर्वी १० मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. पदभार स्विकारला तेव्हापासून त्याने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याच्या तक्रारी सुरू होत्या,अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान कारवाईनंतर बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Post a Comment

0 Comments