पांगरी सोसायटीच्या चेअरमनपदी युवराज खबाले ; सभापती रणवीर राऊत यांनी फिरवले चक्रबार्शी |

पांगरी सोसायटीवर सोपल गटाचे ८ तर आमदार राऊत गटाचे ५ सदस्य निवडून आले होते. निवडणुकीनंतर सभापती रणवीर राऊत यांनी चक्र फिरवली व राऊत गटाचे सभापती उपसभापती झाले आहेत.  बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोपल गटाचे समर्थक सोसायटी सदस्य युवराज खबाले,संदीप खबाले व गणेश वासकर यांनी राऊत गटात जाहीर प्रवेश केला,या सर्वांचा सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांनी सत्कार केला.
   
  पांगरी सोसायटीच्या चेअरमनपदी युवराज खबाले, व्हा.चेअरमनपदी रामलिंग गोडसे यांची निवड झाल्याबद्दल बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला तसेच सदस्य मारुती वाकडे,रावसाहेब देशमुख,विजय वासकर,हिराबाई धावणे,गोरोबा काकडे यांचाही सत्कार करण्यात आला.

 यावेळी ॲड.अनिल पाटील,सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय गरड सर,ज्येष्ठ नेते विलास जगदाळे,सुहास देशमुख,रामभाऊ लाडे जयंत पाटील,गणेश काळे,विलास लाडे, बाळासाहेब मोरे मेजर, धनंजय खवले,शहाजी धस,युवा नेते सागर गोडसे तसेच इतर प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments