धामणगाव येथे रंगला अखंड हरिनाम सप्ताह ; १८ मे रोजी कुंडलिक महाराज पाटील धामणगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता



बार्शी |

विठुरायाची धाकटी पंढरी म्हणून धामणगाव चा उल्लेख केला जातो. संत सद्गुरू माणकोजी महाराज बोधले यांची समाधीही धामणगाव येथे आहे. माणकोजी बोधले महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. कुंडलिक महाराज पाटील धामणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. टाळ मृदंगाचा गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जय घोषामध्ये हा सप्ताह मोठ्या भक्तीवर वातावरणात साजरा होत आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ११ मे पासून मोठ्या उत्साहा मध्ये झालेली आहे. ह भ प अर्जुन महाराज लाड, ह भ प वैराग्यमूर्ती गुरुवार्य ज्ञानेश्वर महाराज कदम व ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज मुडेकर यांची सुश्राव्य कीर्तने झालेली आहेत. आज दिनांक १४ मे रोजी प्रभाकर महाराज बोधले ( माणकोजी बोधले यांचे वंशज) यांचे तर १५ मे रोजी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांची कीर्तन सेवा होणार असून १६ मे रोजी ह भ प महादेव महाराज राऊत ( म्हसाळा जवळा, बीड) यांची तर १७ मे रोजी ह भ प केशव महाराज उखळीकर (आळंदी, पुणे) यासारख्या प्रसिद्ध कीर्तनकाराचे समाज प्रबोधनात्मक कीर्तने होणार आहेत.

काकड आरती, संजीवनी समाधी जलाभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व रात्री कीर्तन अशी कार्यक्रमाची भरगच्च रेलचेल आहे. १८ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये नगरप्रदक्षिणा साडेनऊ पर्यंत अल्पोहार व सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये ह भ प कुंडलिक तात्या पाटील धामणगावकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून धामणगाव ग्रामस्थांच्या वतीने दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments