बार्शी तालुक्यात हातभट्ट्यांवर धाडी सोलापूर-धाराशिव राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई एकूण 1,51,500/- /- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - अधिक्षक नितिन धार्मिकबार्शी |

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापुर व धाराशिव जिल्ह्यांच्या पथकांनी बुधवारी सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील हातभट्ट्यांवर धाडी टाकून दीड लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी बुधवारी (ता. 17 ) बार्शी तालुक्यातील भातंबरे / यमाई तांडा याठिकाणी सकाळच्या सुमारास संयुक्तपणे धाडी टाकल्या. या धाडीत गावठी दारु निर्मितीच्या भट्ट्या नष्ट करुन 3 वारस गुन्हे नोंदविण्यात आले असून हातभट्टी चालक व जागा मालकांचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत 7200 लिटर गुळमिश्रीत रसायन, लोखंडी भट्टी बॅरल, प्लॅस्टिक बॅरल व 50 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन जागीच नष्ट करण्यात आली. फरार आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत विभागाने रु. 1,51,500/- /- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक तथा निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, सुनिल कदम, गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, रोहिणी गुरव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, वाहनचालक रशिद शेख व राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव जिल्हा येथील अधिकारी कर्मचा-यांनी पार पाडली.

आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारुविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments