अर्जुन कपुरसोबतच्या लग्नाबाबत मलायकाने केला मोठा खुलासा


मुंबई | 

बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. सोबतच ते अनेकदा एकत्र फिरतानाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. या जोडीने एकमेकांना डेट करत सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसले होते.

मध्यंतरी ही जोडी लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. पण अर्जुनने आम्ही अजूनही लग्न करण्याचा विचार केला नाही असं म्हणत सर्व चर्चा धुडकावल्या. अशातच पुन्हा एकदा या जोडीने एका मुलाखतीत लग्नाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

मलायका व अर्जुन एकमेकांच्या प्रेमामध्ये नेहमीच आकंठ बुडालेले होते. खुलेपणाने ते एकमेकांवर आपलं प्रेम व्यक्त करताना सर्वांनीच कदाचित पाहिलं असेल. आता मलायकाने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. आता मात्र चाहते मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे

Post a Comment

0 Comments