३ कोटी ८५ लाखांच्या बार्शी तालुका पोलिस स्टेशन नवीन इमारत भुमिपुजन बार्शी |

 सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले तालुका पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी ३ कोटी ८५ लाख मंजूर कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

  समाजातील वाईट लोकांवर कारवाई करणे व चांगल्या लोकांचे संरक्षण करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे.गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी गुन्हा घडण्या आधी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

  यावेळी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,तालुका पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे,पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे तसेच इतर प्रमुख अधिकारी व पोलीस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments