करमाळा |
करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या अंगावर काळा बुका टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पंचायत समिती येथे पोलिस बंदोस्त लावण्यात आला आहे.
जेऊर ग्रामपंचायतीमधील गैरकारभार झाल्याचा आरोप करत बालाजी गावडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी भोंग हे गटविकास अधिकारी कक्षाच्या बाजूला त्यांच्या दालनात अंदोलकांशी चर्चा करत होते. चर्चा सुरु असतानाच अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तेथून त्यांनी पळ काढला अशी चर्चा आहे.
भोंग म्हणाले, जेऊर येथील बालाजी गावडे यांच्यासह काही व्यक्ती कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्या मागणीनुसार सबंधीत अधिकार्यांनी चौकशी अहवाल दिला आहे. त्यांच्याशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी तोंडावर काळे टाकले. दरम्यान गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन स्वीच अॉफ असल्याचे सांगत आहे. सबंधित घटनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
0 Comments