धाराशिव |
धाराशिव शहरात पोलीस असल्याची बतावणी करून महिलांना फसवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास २५ हुन अधिक गुन्हे दाखल होऊनही खऱ्या पोलिसाना तोतया पोलीस सापडत नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.
शहरातील एका वृद्ध महिलेस तीन ठकसेनानी आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गल्लीत लक्ष्मीबाई व तिच्या नवऱ्याचा खुन झाला आहे, अशी बतावणी करून सदर महिलेच्या अंगावरील चार तोळे सोन्याचे दागिने ( किंमत अंदाजे २ लाख ) घेऊन पोबारा केला . याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडले असे की, संभाजीनगर, धाराशिव येथील- शालिनी श्रीधर पाटील ( वय 73 वर्षे ) ह्या वृद्ध महिला दि. 17.04.2023 रोजी 14.00 वा. सु. रामनगर येथील मोहिते यांचे घरी पायी जात होते. दरम्यान तीन अनोळखी पुरुषाने शालिनी यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून तुम्ही रस्त्यावर फिरु नका तुमच्या गल्लीमध्ये लक्ष्मीबाई व तिच्या नवऱ्याचा खुन झाला आहे. आम्हाला वरुन आदेश आहे अशी बतावणी करुन शालिनी यांच्या अंगावरील 41 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने काढून घेऊन शालिनी यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या शालीनी पाटील यांनी दि. 18.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 170, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे
0 Comments