सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अमित पडवळ दांपत्याने केले अन्नपूर्णा योजनेचे पूजन


बार्शी |

बार्शी शहरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अमित पडवळ व स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुषमा अमित पडवळ या दांपत्याच्या हस्ते आज २ एप्रिल रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन झाले. शहरातील कुर्डूवाडी रोड येथे डॉ. पडवळ यांचे श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड न्यूरो केअर सेंटर असून ते अत्याधुनिक हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. डॉ. अमित पडवळ हे बार्शी शहरांमध्ये गेल्या आठ-दहा वर्षापासून कार्यरत आहेत. मेंदूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मध्ये ते आग्रनामांकित आहेत. त्यांच्या पत्नी सुषमा पडवळ ह्या स्त्रीरोग तज्ञ आहेत. डॉ. अमित पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त पडवळ दांपत्याने अन्नपूर्णा योजनेचे पूजन केले. विविध सामाजिक उपक्रमातही पडवळ कुटुंबीयांचा अग्रणी सहभाग असतो.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण डॉ अमित पडवळ व सुषमा या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.

Post a Comment

0 Comments