महाराष्ट्र विद्यालयात आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन

बार्शी |

शनिवार दिनांक ११/ ०३/ २०२३ रोजी भारत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खरी कमाई - आनंद बाजारचे आयोजन महाराष्ट्र विद्यालयात केले होते.या आनंद बाजाराचे उद्घघाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे खजिनदार माननीय श्री. जयकुमार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.ए.चव्हाण, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे,विद्यालयातील स्काऊट व गाईडचे विभाग प्रमुख  उपळकर वाय.एस., क्रिडा शिक्षक ए.वाय.  पाटील, पी.डी.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उत्साहात भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले होते.त्या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतला. अत्यंत आनंदी वातावरणात हा आनंद बाजार पार पडला.

Post a Comment

0 Comments