बार्शी | अत्याचारग्रस्त मुलीवर खुनी हल्ला भोवला ; एपीआयसह चौघे निलंबितबार्शी |

 बळेवाडी अत्याचार आणि मारहाणप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर त्यांनी पालकासमवेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती परंतु घटनेचे गांभीर्य न ओळखता आरोपीला पोलिसांनी पकडले नाही दुसऱ्या दिवशी आरोपींनी तरुणीवर सतुर ने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बार्शी तालुका API, बार्शी शहर पोलीस PSI आणि 2 पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आलंय.

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि मारहाण प्रकरणी वेळकाढूपणा आणि नाकर्तेपणा भोवला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बुधवारी ही कारवाई केली.

एपीआय महारुद्र परजणे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, हेड कॉन्स्टेबल अरुण भगवान माळी, अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments