बार्शी | दडशिंगे बांधाच्या कारणावरून दोघाला काठीने मारहाण ३ जणांवर गुन्हा दाखल



बार्शी |

पिकअप नेल्यामुळे आमच्या बांधाचे नुकसान झाले आहे बांध आहे असा करून द्या म्हटल्यामुळे बार्शी तालुक्यातील दडशिंगे येथे दोघाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. तिघांविरुद्ध तालुका पोलीस आत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद श्रीमती जनाबाई अंकुश हजारे (वय ५०)रा. दडशिंगे ता. बार्शी यांनी दिली आहे

या घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की,  शेतातील बांधावरून पिकप नेला त्यामुळे बांधाचे नुकसान झाले आहे आमचा बांध आहे असा करून द्या, असे म्हटल्यामुळे फिर्यादी व त्यांचा मुलगा प्रवीण या दोघाला काठीने मारहाण करून दमदाटी केली आहे. सदरच्या बांधाचा वाद गेल्या दहा वर्षापासून आहे जुन्या वादाचा राग काढून काठीने मारहाण केल्याप्रकरणी पुतण्या दीपक किसन हजारे, अमोल किसन हजारे व दीर किसन चांगदेव हजारे या तिघाजणाविरुद्ध तालुका पोलिसात भादवि कलम  ३२३,३२४,३४,५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments