बेवारस केशव काका कुलकर्णी यांच्यावर तडवळे करांनी केले विधीवत अंत्यसंस्कार



बार्शी |

बार्शी तालुक्यातील अभ्यासाचे गाव म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या तडवळे गावाने पुन्हा एकदा साजेसे कार्य करीत निराधार असलेल्या केशव काका कुलकर्णी यांचा अंत्यविधी विधवत पार पाडला आहे. तडवळे गावातील केशव कुलकर्णी यांनी श्री यशवंत महाराज मठातील महाराजांची आणि विठ्ठल रखुमाईची सेवा अविरहितपणे पार पाडली ज्यांनी देवाला आपल्या सेवेतून आकार दिला.

 अशा केशव काकांना निराधार असल्यामुळे गावकऱ्यांनी खाऊ पिऊ घालून आधार दिला मात्र वर्धाक्याने निराधार असलेले केशव काका आनंदात विलीन झाले, त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न गंभीर होता निराधार असल्यामुळे अंत्यसंस्कार करायची कुणी असा प्रश्न उपस्थित झाला.

 त्यावेळी गावातील मेजर संजय आवारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आवारे, तात्या भोसले, मधुकर कदम, प्रशांत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, बाळू शिराळ, सुभाष आवारे, दशरथ आवारे, व्यंकट आवारे, अमोल आप्पासाहेब लोखंडे, विष्णू येवारे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी तडवळे मधील स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन अंत्यविधी पार पाडला. या अंत्यविधीसाठी तडवळे गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत इच्छेनुसार काही रक्कमही गोळा केली. शेवटच्या क्षणी बेवारस असलेल्या केशव काकांना सामाजिक बांधिलकीतून अनेक वारसदार मिळाले.

Post a Comment

0 Comments