विद्या बालनच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर वातावरण तापलं



मुंबई |

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या  स्टाइलची जेव्हा चर्चा असते, तेव्हा तिच्या साडीतील लूकला चाहते पसंती दर्शवतात. विद्या बालनलाही साडी नेसणं फार आवडतं. यामुळेच अनेक कार्यक्रमांमध्ये विद्या बालन साडी नेसलेल्या पारंपारिक पोषाखात दिसते. यामुळेच जेव्हा विद्या बालनने 'डर्टी पिक्चर'मध्ये बोल्ड भूमिका निभावली होती, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान विद्या बालनचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. या फोटोत विद्या बालन बोल्ड अवतारात दिसत आहे. 

विद्या बालनने नुकतंच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये विद्या बालनने पुन्हा एकदा आपली बिनधास्त बाजू दाखवली आहे. या फोटोत विद्या बालनने अंगावर एकही कपडा घातलेला नसून हातामध्ये कप आणि वृत्तपत्र पकडलं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे विद्या बालनने गॉगल घातलेला असून पायात हिल्स आहेत. स्वत: विद्या बालनने इन्स्टाग्रामला हा फोटो शेअर केला आहे. विद्या बालनच्या या बोल्ड आणि फॅशनेबल फोटोची चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही चांगलीच चर्चा आहे. 

Post a Comment

0 Comments