सोलापूर | सावत्र बापाची नियत फिरली, आठ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखलसोलापूर |

सावत्र बापाने आठ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे
केल्याप्रकरणी सावत्र बापावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी आपल्या पहिल्या पतीशी वाद होत असल्याने त्या मागील सात वर्षापासून पहिल्या पतीपासून वेगळे राहत त्या आरोपी सोबत राहत होत्या. शिवाय त्यांच्या सोबत त्यांची आठ वर्षाची मुलगी व पाच वर्षाचा मुलगा असे दोघे सोबत राहत आहेत. मंगळवारी रात्री घरातील सदस्य झोपलेले असताना आरोपीने पीडित आठ वर्षाच्या मुलीच्या जवळ जाऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडित मुलगी ही.जोरात रडू लागल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहे.

Post a Comment

0 Comments