सोलापूर | डॅमच्या त्रासाला कंटाळून विधी अधिकाऱ्याने दिला होता राजीनामा



सोलापूर |

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी जिल्हा लेखाधिकारी वैशाली थोरात यांच्या बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियुक्तीस असलेल्या एका महिला विधी अधिकाऱ्याने डॅमच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला होता.त्या विधी अधिकाऱ्याने राजीनामा देताना, स्पष्टपणे नमूद करत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नावे अर्ज दिला होता. "डॅम वैशाली थोरात यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे.”एनआरएचएम मधील विधी अधिकाऱ्याने दिलेल्या राजीनाम्याबाबत कोणतीही चौकशी न करता, उलट विधी अधिकाऱ्याच राजीनामा मंजूर करून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. यावरून हे स्पष्ट दिसून येते की,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, आणि जिल्हा आरोग्य अधिकारी या सर्व कार्यालयात डॅम वैशाली थोरात यांचा दबदबा कायम आहे.

कंत्राटी डॅम वैशाली थोरात यांना सर्वच अधिकारी घाबरतात-
सोलापूर जिल्ह्यात एक वादग्रस्त अधिकारी म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी जिल्ह्या लेखाधिकारी वैशाली थोरात यांना सर्वच कार्यालयातील अधिकारी घाबरतात. अनेक तक्रारी डॅम वैशाली थोरात यांच्या विरोधात आल्या. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून डॅम वैशाली थोरात यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबन झाल्यानंतर, काही वर्षांनंतर वशिला लावून पुन्हा सोलापूर जिल्ह्यात जिल्हा लेखाधिकारी पदावर रुजू झालेल्या वैशाली थोरात यांना सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकारी दचकून आहेत. सर्व वरीष्ठ कार्यालयात दबदबा कायम आहे. कारण इतक्या तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन जुजबी कारवाई करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही असे चित्र निर्माण झाले आहे. डीएचओ, सिव्हिल सर्जन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ आधी अधिकारी डॅम वैशाली थोरात यांना दचकून आहेत.

विधी अधिकाऱ्याने डॅमच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला
तरीही कारवाई नाही-
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या एका महिला विधी अधिकाऱ्याने 2021 साली राजीनामा दिला होता. राजीनामा देताना, स्पष्टपणे उल्लेख केला होता, डॅम वैशाली थोरात यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे. हा राजीनामा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला होता. या राजीनाम्या बाबत चौकशी होण्या ऐवजी उलट, विधी अधिकाऱ्याच राजीनामा मंजूर करण्यात आला. विधी अधिकाऱ्यास कार्यमुक्त करण्यात आले. सोलापूर जिल्हा प्रशासन आजतागायत डॅमची कोणतीही चौकशी न करता मूग गिळून गप्प आहे.उपसंचालक आरोग्य सेवा पुणे येथील कार्यालयात याबाबत चौकशी सुरू आहे.पण या ठिकाणी तारीख पे तारीख सुरू आहे. त्या महिला विधी अधिकाऱ्यावर जो अन्याय झाला, त्यावरमात्र आजतागायत सोलापूर जिल्हा प्रशासनातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही.

Post a Comment

0 Comments