वैराग |
बार्शी तालुक्यातील पिंपरी येथे रमी नावाचा जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून १ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे, हि कारवाई २१ मार्च रोजी दुपारी ३.२० वाजता केली आहे. या घटनेची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पिंपरी गावांमध्ये रमी नावाचा जुगार खेळला जात आहे. त्या माहितीच्या आधारे वैराग पोलिसांनी खाजगी वाहनाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता भाऊसाहेब पाटील यांच्या शेताजवळ चिंचेच्या झाडाखाली ९ जण गोलाकार बसून पैशावर हरजीत होणारा रमी नावाचा जुगार खेळताना आढळून आले. नऊ जणांपैकी ६ जणांना पोलिसांनी गराडा घालून पकडले, पण तीन इसम पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम २ मोटरसायकली व जुगारसाठी लागणारा मुद्देमाल जप्त केला आहे.
विलास भागवत जाधव (वय ५०), सुधीर मच्छिंद्र पाटील (वय ४१), रसूल मनोद्दीन पठाण (वय ३८), बडेसाहेब अल्लाउद्दीन शेख (वय ५५), सादिक लिकायत सय्यद (वय ३९), अकबर चंदू सय्यद (वय ३३) सर्वजण रा. पिंपरी आर यांना पोलिसांनी गारडा घालून पकडले. तर पळून गेलेले लक्ष्मण अंकुश कदम, उस्मान बक्तावर डोंगरे, दीपक लक्ष्मण कदम वरील नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ चे अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments