धाराशिव | सहा लाख लाचेची मागणी, पाच लाख तडजोड, दीड लाख घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडले



धाराशिव |

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे सिंदफळ येथील १२० गुंठे शेतजमीन अकृषी करण्याच्या प्रस्तावास तात्पुरती मंजुरी देण्यासाठी सहा लाख लाचेची मागणी तडजोडीअंती पाच लाख ठरवून लागलीच दीड लाख रुपये लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार मयुरेश माणिकराव केंद्रे यांना एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.

यातील तक्रारदार यांचे मौजे सिंदफळ ता. तुळजापूर येथील शेत जमीन गट नंबर १८७ मधील १२० गुंठे अकृषी यासाठीचे प्रस्तावास तात्पुरती मंजुरी  देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक मयुरेश माणिकराव केंद्रे ( वय ३० वर्षे ), सहाय्यक रचनाकार, नगर रचना कार्यालय उस्मानाबाद (वर्ग २ ) यांनी सहा लाख लाचेची मागणी पाच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व सदर पाच लाख रुपये रकमेपैकी दीड लाख रुपये लागलीच स्वीकारण्याचे व उर्वरित साडेतीन लाख रुपये नंतरने स्वीकारण्याचे मान्य करून दीड लाख रुपये लाच रक्कम पंचासमक्ष आलोसे यांनी स्वतः स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एसीबीचे पोलीस अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस निरीक्षक विकास राठोड,पोलीस अमलदार इफ्तेकार शेख ,विष्णू बेळे, विशाल डोके, ,सचिन शेवाळे, अविनाश आचार्य,चालक दत्तात्रय करडे यांनी हा सापळा रचला होता.

Post a Comment

0 Comments