निवडणूक आयोगाचा अश्विनी जगताप यांना दणकाचिंचवड | 

पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिलाय. अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज  प्रकरणी नोटीस धाडली आहे. भाजप उमेदवार  अश्विनी जगताप  यांना पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे.

पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments