उस्मानाबाद पोलिसांची दमदार कामगिरी ; कत्तल खाण्यासाठी लागणारा २६ लाख ७७ हजार रुपयाचा मुद्देमान जप्त


उस्मानाबाद |


उस्मानाबाद शहरातील खिरनीमळा येथे प्राण्याची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तीन टेम्पो किंमत १९ लाख रुपये,गोमांस किंमत ७.५ लाख रुपये जिवंत जनावरे किंमत २० हजार रुपये असा २६ लाख ७७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याविषयी सविस्तर माहिती अशी की, १६ फेब्रुवारी पोलिसांनी उस्मानाबाद मधील फकीरा चौकाजवळ टेम्पो चालकाला अडवून चेक केले असता त्यामध्ये गोमांस आढळले कुठून आणले आहे असे विचारले असता जलील कुरेशी यांच्यात कत्तलखान्यातून असे आयशर चालकाने सांगितले. दुसऱ्या कारवाईमध्ये उस्मानाबाद मधील खाटीक गल्ली येथे छापा मारला त्यावेळी ताजे मांस, कातडे, वाळलेले गोमांस, मांस कापण्यासाठी लागणारे साहित्य व दुसऱ्या बाजूचा असलेल्या वाहनांमध्ये मांस कापण्यासाठी साहित्य आढळून आले. पोलिसांनी २६ लाख ७७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक आतून कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कळंब उपविभाग एम.रमेश शहा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पूजरवाड, पोलीस उपनिरीक्षक चाटे आणि पोलीस स्टाफ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments