बार्शीतील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पालकांनी केला अपहरणाचा संशय व्यक्त..?


बार्शी |

बार्शी शहरातील एका नामांकित अशा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी शहर पोलिसात १२ जानेवारी रोजी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,११ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघाली परंतु ती घरी परतलीच नाही. तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता तिच्या कॉलेजला आलीच नसल्याचे समजले पालकांनी इतर नातेवाईकाकडे ही चौकशी केली परंतु ते कोठेही आढळून आले नाही. मुलीच्या पालकांनी नातेवाईकातील एका मुलासोबत फोनवर बोलत असल्यास ते सांगितले व त्यानेच अपहरण केल्यास चा संशय ही व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर भारतीय दंड संहिता कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करणेवाढ हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments