बार्शी |
बार्शी तालुक्यातील पिंपरी(आर) येथे आमदार राजाभाऊ राऊत यांचे गावात ढोल,ताशे वाजवत जल्लोषात स्वागत करण्यात आले व पंतप्रधान ग्रामसडक योजना नारी-सावरगांव पिंपरी ते खडकी पुल रस्ता ५ कोटी ७५ लाख,जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना ३२ लाख,जनसुविधा मधुन ओढ्यावरील पुल ७ लाख,दलित वस्ती सुधार योजना ३ लाख,जन सुविधा योजनेतुन खंडोबा मंदिर पेव्हर ब्लॉक १ लाख,शाळेला संरक्षण भिंत १ लाख,१४ वा वित्त आयोग RO प्लॅन्ट १ लाख ६७ हजार रुपये,राम नदीवरील खोलीकरण १५ लाख,गावात डांबरी रस्ता १५ लाख,जामगाव ते भातंबरे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ५ कोटी या विकास कामांचा शुभारंभ बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, पंचायत समितीचे उपसभापती प्रमोदजी वाघमोडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती केशव घोगरे,युवा नेते अमोल रानमाळ,सरपंच संतोष जाधव,उपसरपंच श्रीमंत गोफणे,पोपट पाटील,पाशाभाई पठाण,भोलेनाथ पाटील,संतोष जाधव,शरद पाटील,तात्यासाहेब गोफणे,परमेश्वर पाटील तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments