बार्शीत शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणूक उत्साहात ; खासदार नाईक निंबाळकर यांची उपस्थितीबार्शी |

राज-विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त शनिवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा राऊत चाळ येथून शुभारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

  आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक विजय(नाना) राऊत यांच्या नेतृत्वाखाली असलेली ही शिवजयंतीची मिरवणुक अतिशय शिस्तबद्ध असुन ही मिरवणूक म्हणजे बार्शीकरांसाठी एक पर्वणीच आहे. आमदार राजाभाऊ राऊत सर्वसामान्य जनतेच्या विकास कामासाठी निर्माण झालेले नेतृत्व असून त्यांची जनतेशी असलेली नाळ व बांधिलकी मिरवणूकीत सहभागी अफाट जन समुदयावरून दिसून येते.

 छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील सर्वात पारंपारिक असलेली मिरवणूक राज-विजय कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, ३८०९ राऊत चाळ,बार्शी आयोजित मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण छत्रपती शिवरायांचे तीन हालते देखावे,राज्याभिषेक सोहळ्या दिवशी ची हत्ती वरची मिरवणूक,भवानी मातेने दिलेली तलवार, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ,बार्शी शहरातील ढोल-पथक,स्पेशल साऊंड सिस्टम सोबत, हत्ती-घोडे-उंट, लेझीम पथक हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. मिरवणुकीला बार्शी शहर व तालुका तसेच आसपासच्या तालुक्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. तरुणांचा उत्साह वाढवण्याचे काम युवा नेते अभिजीत राऊत,रणवीर राऊत,रणजीत राऊत हे करत होते.मिरवणुकीमध्ये सजवलेल्या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती सह इतर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या.मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.आया है राजा या गाण्यावर तरुणाई अक्षरशः बेभान होऊन नाचत होती.अभिजीत राऊत,रणवीर राऊत,रणजीत राऊत यांना खांद्यावर घेऊन तरूण नाचत होते.

    यावेळी बार्शी शहर व तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर,तरूण व बालगोपाळ,महिला भगिनी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments