कंगणा चांगलीच भडकली; थेट घरी येऊन मारण्याची दिली धमकी




अभिनेत्री कंगना रानौत नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच तिनं बहुचर्चित अशा पठाण चित्रपटावर देखील टिका केली होती. प्रत्येक गोष्टीवर ती धडाडीने आपलं मत व्यक्त करते. अनेकदा यामुळे तिला ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे. अशातच आता कंगणा जास्तच भडकल्याची दिसत आहे.

पुन्हा एकदा कंगणाने बाॅलीवूड  माफियांविरोधात आवाज उठवला आहे. या लोकांनी सुधारणा केली नाही तर मी तुम्हाला घरात घुसून त्यांना ठार करेन. अशा प्रकारची इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यावेळी कंगनाची काळजी करणाऱ्यांनादेखील सांगितलं आहे.

मी अगदी सुरक्षित आहे. काल रात्रीपासून तीच्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल झाली नसल्याचं सांगितलं आहे. तिच्या मागे कोणीही कॅमेऱ्याशिवाय किंवा कॅमेऱ्यासोबत नाही आहे. कोणीही तिचा पाठलाग करत नाही आहे. लाथ खाणारी भूतं बोलण्यांनी ऐकत नाहीत. असंही ती म्हणाली.

मी किती वेडी आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे, त्यामुळे चंगू-मंगू गॅगला माझी सक्त ताकीद आहे की, लवकरात लवकर सुधारा नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घूसुन मारीन अशी चेतावणीच कंगनानं दिली आहे. कंगणानं अशी स्टोरी टाकण्याचं कारण अनेकांना समजल नाही आहे.

Post a Comment

0 Comments