करमाळा | कंदर येथे विजेचे काम करताना वायरमनचा मृत्यू


करमाळा |

 तालुक्यातील कंदर येथे विद्युत वाहिन्यांच्या ट्रान्सफार्मचे काम करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. सोमवारी (ता. ६) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. साधारण दीड वर्षांपूर्वीही येथे असाच प्रकार झाला होता. सोमवारी नदीकाटावर विजेच्या ट्रान्सफार्मचे काम करताना ही घटना घडली आहे. 

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे गोविंदा (संपुर्ण नाव समजू शकलेले नाही) असे नाव असल्याचे समजत आहे. विजेचे काम करताना शॉक लागून हा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असून याची चौकशी करून दोशींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments