गुळपोळी येथे भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात माता-पिता पूजनाचा आगळावेगळा कार्यक्रमबार्शी |

बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालयात मानवता संयुक्त संघ व योगी वेदांत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माता-पिता पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहा मध्ये घेण्यात आला. सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलावर संस्कार करण्यासाठी सध्याची पिढी कुठेतरी कमी पडते याची जाणीव ठेवून माता पिता पूजनाचा आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांबरोबरच गुरुजन व माता पिता यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले मातापित्यांची विधिपूर्वक पूजा केल्यानंतर या कार्यक्रमांमध्ये रंगत आली. 

शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम वर्षातून एकदा तरी राबवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुमंत माळी असे मत व्यक्त केले. मानवता संयुक्त संघाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवली जातात याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय कोरे यांनी दिली.

या कार्यक्रमाला योग वेदांत समितीचे अध्यक्ष अश्विन कुमार, मानवता संयुक्त संघचे जिल्हाध्यक्ष विजय कोरे, तालुका अध्यक्ष समाधान विधाते,  रेणुका मंगल कार्यालयाचे मालक देशमुख सर, दिलीप गव्हाणे, राजेभाऊ गव्हाणे, दिलीप कुलकर्णी, सरपंच उपसरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच गावातील पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments