“चोरीच्या ०३ मोटारसायकल व मोबाईलसह आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई"


उस्मानाबाद |

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा उस्मानाबाद शपथकाने चोरीच्या ३ मोटरसायकल सह आरोपीला अटक केली आहे. पोलिसाला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली व त्याच्या आधारे अक्षय बाळू शिंदे रा.कोंड ता. जि. उस्मानाबाद याला मुद्देमालास म्हणून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली. अक्षय बाळु शिंदे रा. कोंड ता.जि.उस्मानाबाद रहिवाशी असून याचे कडे चोरीच्या मोटारसायकल असुन त्याने त्याचे राहते घरामध्ये ठेवल्या आहेत. 

त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन अक्षय बाळु शिंदे याचा शोध घेतला असता तो कोंड शिवारातील शेतामध्ये मिळुन आला. त्याचे राहते घरी जावुन खात्री केली, असता त्याचे घरात एकुण ०३ मोटारसायकल व ०१ मोबाईल मिळुन आला. सदर मोटारसायकली व मोबाईल बाबत माहिती घेतली असता मोबाईल चोरीबाबत उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे तर इतर ०३ मोटारसायकल विषयी माहिती घेतली असता त्या चोरीझाले बाबत शिराढोण पोलीस ठाणे, सोलापुर जिल्हातील सोलापुर तालुका व पांगरी पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. ०३ दुचाकी मोटारसायकल व ०१ मोबाईल असा एकुण १,४६,०००/-रु चा मुददेमालासह ताब्यात घेवुन पुढिल कायदेशीर कारवाई करीता उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि यशंवत जाधव, सपोनि - श्री शैलेश पवार, पोउपनि संदिप ओहोळ पोहका-विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, मेहबुब अरब, पोना- नितीन  जाधवर अजित कवडे बबन जाधवर या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments