उद्धव ठाकरेंना यांच्या सर्वात जवळची व्यक्ती शिंदेंच्या संपर्कात?मुंबई |

उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या सपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नार्वेकर विधीमंडळात दिसले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मिलिंद नार्लेकर मातोश्रीच्या जवळचे होते. पण आता ते त्यांच्यापासून खूप दुरावले आहेत, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

Post a Comment

0 Comments