गौडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा

बार्शी |
        
 गौडगाव ता. बार्शी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेची जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या सहकार्याने गौडगाव येथे कार्यशाळा घेण्यात आली.
     
 सोलापूर जिल्हा ग्रामसुरक्षा यंत्रणेचे अधिकारी गणेश लोकरे यांनी गौडगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेसाठी देण्यात आलेल्या यंत्रणेचा फोन नंबर १८००२७०३६०० या नंबरचा वापर कसा आणि कधी करावा याबद्दलचे मार्गदर्शन केले.
     
महाराष्ट्र शासनाने ग्रामसुरक्षा यंत्रणा या नावाने अॅप तयार केला असून, आपल्या गावातील अमर्यादित फोन नंबर समाविष्ट करता येणार आहेत. आपल्या गावातील, परिसरामध्ये होणाऱ्या सामाजिक घटकांची माहिती या नंबर वरून पोलीस प्रशासन आणि गावातील या यंत्रणेची जोडलेल्या सर्व व्यक्तींना एकाच वेळी संदेश देऊन घटनेची माहिती देण्यात येते. यामुळे सर्वांनी या यंत्रणेचा वापर करण्याचे आवाहन गणेश लोकरे यांनी केले.
    
यावेळी उपस्थित सरपंच स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, राहुल भड, ग्रामसेवक संतोष माने, पोलीस हवालदार गणेश नाळे, शिवाजी मुंडे, ब्रह्मदेव वाघमारे, सतीश शिंदे तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, रेशन दुकानदार, गावातील जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments