"मी सुरक्षा मागितली नाही, मी एकटा वाघ आहे" - संजय राऊत



मुंबई | 

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं. त्याच पत्रामुळं आता वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. याचसंबधी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना मारण्याचा कट केला जात असून तो शिंदे गटातील नेते श्रीकांत शिंदे यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर टिका केली आहे.

यावर राऊतांनी पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिलं आहे. माझ्या पत्रात पाहिलं असेल तर तुम्हाला दिसून येईल मी सुरक्षा मागितली नाही. आम्ही लाचार नाही. सुरक्षा द्यावी म्हणून मी हे पत्र लिहलं नाही. मला सुरक्षा नाही दिली तरी चालेल. मी एकटा वाघ आहे. असे खूप वार आम्ही अंगावर झेलले आहेत, असं सडेतोड उत्तर राऊतांनी दिलं आहे.

Post a Comment

0 Comments