सोलापूरच्या 'या' माजी मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल



सोलापूर |

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. मग ते कोयता गँग असेल की वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे असतील. या गुन्ह्यांमुळे पुण्यातील नाव हे सध्या चर्चेत आहे. अश्यातच भाजप सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेल्या उत्तम प्रकाश खंदारे वय 65 यांच्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार व बलात्काराच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

३७ वर्षे पीडित महिलेवर वर आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आयबी रेस्ट हाऊस या शासकीय निवासस्थात बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी बिबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल. उत्तम प्रकाश खंदारे हे मूळचे सोलापूरचे असून 1995 मध्ये युतीच्या सरकारात राज्यमंत्री होते. ३७ वर्षी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध व बळजबरीने चाकूचा धाक दाखवत नैसर्गिक कृत्य आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 खंदारे यांच्यासोबतच इतर तिघांचाही या गुन्ह्यात समावेश आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तम खंदारे सोलापूर शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एका 37 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, उत्तम प्रकाश खंदारे, महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेवर भादंवी कलम 376, 377, 420, 406, 502 (2), 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments