लायन्स क्लब बार्शी टाऊनचा विधायक उपक्रमबार्शीत पत्रकारांची सर्वांगिण आरोग्य तपासणी


बार्शी. ता 8 लायन्स क्लब बार्शी टाऊन व कोठारी लॅबॉरेटरीजच्या संयुक्तपणे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.8) सकाळी कोठारी लॅबॉरेटरी मध्ये बार्शी शहरातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अमित कटारीया, सचिव आदित्य कोठारी, खजिनदार राजाभाऊ काळे, रवी बजाज, प्रकाश फुरडे, हेमंत जमदाडे, अ‍ॅड.अविनाश जाधव, बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित कुंकुलोळ व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी  क्लबचे अध्यक्ष कटारिया म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांचे आरोग्य  चांगले रहावे वेळीच त्यांना आजाराबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्या बाबत जागरूक रहावे यासाठी लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पत्रकारांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यापेक्षा त्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी भविष्यातही लायन्स क्लबच्या वतीने आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येतील असेही कटारीया यांनी यावेळी सांगितले.

बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष कुंकूलोळ यांनी लायन्स क्लब बार्शी टाऊन व कोठारी लॅबचे आभार मानत पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित केलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. पत्रकारांनी आरोग्य काळाजी घेतली तर अधिक चांगल्या पध्दतीने पत्रकारिता करता येईल त्यासाठी पत्रकारांनी तंदुरूस्त रहाणे ही काळाची गरज आहे.

क्लबचे सचिव व कोठारी लॅबचे संचालक आदित्य कोठारी म्हणाले, लायन्स क्लब बार्शी टाऊनने सामाजिक बांधिलकीतून पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांची  आरोग्य तपासणी केली या तपासणीत प्रामुख्याने रक्तातील चरबीचे प्रमाण (कोलेस्ट्रॉल), यकृत (लिव्हर प्रोफाईल) तपासणी, थायरॉईड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, डायेबेटीक स्क्रिन ( एचबी 1 सी),आर्यन डेफिसीएनसी प्रोफाईल, रक्तातील विविध पेशींचे प्रमाण व हिमोग्लोबीनचे प्रमाण या तपासण्या केल्या. प्रास्ताविक व आभार लायन्स क्लब बार्शी टाऊनचे खजिनदार राजाभाऊ काळे यांनी मानले. तपासणीसाठी शहरातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments