मिताली राज बनली महिला आयपीएल टीम गुजरात जायंट्सची 'मेंटॉर'

 
मुंबई |

भारताची माजी कर्णधार मिताली राजची महिला प्रीमियर लीग टीम गुजरात जायंट्सने मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. महिला प्रीमियर लीगचा प्रारंभिक टप्पा यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे.

 महिला प्रीमियर लीग साठी नुकत्याच झालेल्या लिलावात अहमदाबाद फ्रँचायझी पाच संघांमध्ये सर्वात महाग होती. या फ्रँचायझी साठी अदानी स्पोर्टलाइनने 1,289 कोटी रुपयांची बोली लावली होती. मितालीने शनिवारी सांगितले की, महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन हंगाम महिला क्रिकेटसाठी एक उत्तम पाऊल आहे. तसेच अदानी समूहाचा सहभाग या खेळाला मोठी चालना देणारा आहे. बीसीसीआयच्या या उपक्रमामुळे देशात महिला क्रिकेटच्या विकासाला मदत होईल आणि युवा खेळाडूंनाही व्यावसायिकपणे क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे ती म्हणाली.

Post a Comment

0 Comments