अभ्यासाच्या ताणतणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्याबीड |

बीड जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी केजच्या कोठी या गावातील रहिवाशी होती. प्रेरणा किसन डोंगरे असे या तरुणीचे नाव आहे. ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दहावीचे काही दिवसांपुर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मार्चमध्ये ही परीक्षा होणार आहे. 

ही विद्यार्थिनी दररोज अभ्यास करत होती. मात्र, आपण केलेला अभ्यास लक्षात राहत नसल्याने ती चिंतेत होती. त्याच चिंतेत तिने आपले जीवन संपवले आहे. आई-वडील झोपलेले असताना घरातीलच लोखंडी खांबाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन तीने आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी पोलिसांना माहिती दिली व घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Post a Comment

0 Comments