सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने, राजकीय दबावाखाली ,बेकायदेशीर पणे झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात यासाठी सूर्यकांत गोविंद चिकणे अध्यक्ष भैरवनाथ शेतमजूर संघटना पश्चिम महाराष्ट्र यांनी दि 9/01/2023 रोजी जिल्हाधीकारी,जिल्हा उपनिबंधक यांचेकडे मागणी केली आहे,सदरच्या बदल्या तात्काळ रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दि 27/01/2023 रोजी बेमुदत बोंबा बोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ज्या कर्मचाऱ्यांची तीन महिन्यापुर्वी ज्या शाखेत बदली करण्यात आली होती त्याच शाखेत कमीत कमी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर बदली होणे अपेक्षित असते, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेतील व्यवस्थापक /प्रशासक यांनी राजकीय दबावामुळेच ज्या कर्मचारी यांची तीन महिन्यापुर्वी बदली झाली त्यांचीच तात्काळ बदली करण्यात आली अशा प्रकारे चुकीच्या व बेकायदेशीर, राजकीय दबावामुळे झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात विशेष करून फक्त बार्शी तालुक्यातीलच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत,तरी सदरच्या बदल्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात अन्यथा 27/01/2023 रोजी भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी बेमुदत बोंबा बोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
0 Comments