"पशुखाद्य कारखाना उत्पादन व चिलिंग सेंटरचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या शुभहस्ते उद्घाटन..."


बार्शी |

बुधवार  दि. २५/०१/२०२३ रोजी सायंकाळी ५  वा. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित, सोलापूर  या संघाचे मौजे - जामगाव , तालुका - बार्शी येथील 'पशुखाद्य कारखाना उत्पादन व चिलिंग सेंटर' संकलनाचा नव्याने शुभारंभ माजी विधी व न्यायमंत्री  दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
                  
याप्रसंगी बोलताना दिलीपरावजी सोपल म्हणाले की, दीड वर्षापासून बंद असलेला पशुखाद्य कारखाना आज तो पुन्हा नव्याने सुरू होत आहे . यामधून चांगल्या व उत्तम दर्जाचे पशुखाद्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर संघाने मदर डेअरीशी चांगला भाव वाढवून घेऊन करार केला आहे. असा उपक्रम संघाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. तसेच सर्व प्रकारचे व्यवहार हे ऑनलाईन ई टेंडर पद्धतीने करून पारदर्शी व्यवहार करण्याचा प्रयत्न हे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व संचालक मंडळ करत आहेत. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे.
                     
याप्रसंगी बोलताना चेअरमन श्री.रणजितसिंह (भैय्या) शिंदे म्हणाले कि, आज नव्याने सुरु होत असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चिलीऺग सेंटरमध्ये दुध संकलन वाढीस मदत करावी अशी विनंती त्यांनी यावेळी बार्शी येथील दुध सऺस्थाचे चेअरमन व दूध उत्पादकाऺना केली. 'सोलापूर जिल्हा दूध संघ' ही शेतकरी व दूध उत्पादकांची सोलापूर जिल्ह्यातील हक्काची अशी एकमेव सहकारी संस्था आहे. संघाचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरीने करत आहोत. आपल्या पशुखाद्य कारखान्यांमधील पशुखाद्य हे अतिशय चांगले आहे. त्याच्या दर्जा व गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही. जिल्हा दूध संघाच्या सभासदास पशुखाद्य वाटपास प्रथम प्राधान्य देणार आहोत. 
              
ते बोलताना पुढे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ झालेली नव्हती. त्यास प्राधान्य देऊन कर्मचाऱ्यांच्या पगारी त्यांचे पद व कामानुसार वाढवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर टेंभुर्णी येथे शंभर गाळ्याचे बुकिंग करून त्याचे बांधकाम सुरू केलेले आहे. यामधून संघास दर महिन्याला भाडे मिळणार आहे.
                  
यावेळी व्हॉ.चेअरमन दीपक माळी , जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सगरोळीकर साहेब, जि प सदस्य बंडूनाना ढवळे , माढेश्वरी बँकेचे संचालक दिगंबर माळी , शेवते सोसायटीचे चेअरमन अरविंद पाटील, सचिव भारत पाटील, संतोष कुलकर्णी,  कामतीचे उपसरपंच दीपक काटकर, छबु फुलसागर, जिल्हा दूध संघाचे सर्व संचालक इ. मान्यवर व संघाचे अधिकारी व कर्मचारी तसेच बार्शी , माढा व इतर तालुक्यातील विविध दूध संस्थांचे चेअरमन , दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments